ग्रामपंचायत निवडणुकीत विखे-काळे आघाडीविरोधात कोल्हे गट !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चितळी ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचदाच्या दोन उमेदवारांनी व सदस्यपदाच्या १० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सरपंचदासाठी चार तर सदस्य पदासाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, सरपंचदासाठी विखे-काळे गटाकडून दीपाली विष्णू वाघ तर कोल्हे गटाकडून ज्योती दर्शन गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे.


चितळी ग्रामपंचायत ही राहाता तालुक्यात आहे; परंतु विधानसभा मतदारसंघाकरिता ही ग्रामपंचायत कोपरगाव मतदारसंघात येते. त्यामुळे या ग्रामपंचायतीला विशेष महत्व आहे. तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम राहावे यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते डॉ. सुजय विखे पाटील हे या निवडणुकीत लक्ष ठेवून आहेत. 

युवा नेते आशुतोष काळे व आ. स्नेहलता कोल्हे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीमध्ये विखे व काळे गटाने आघाडी केल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. तर कोल्हे गटाने आपले स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. सरपंच पदाव्यतिरिक्त पाच प्रभागांमध्ये १३ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. सरपंचपदासाठी आघाडीकडून दीपाली विष्णू वाघ तर कोल्हे गटाकडून ज्योती दर्शन गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.