विहिरीत क्रेन पडून चालकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे विहिरीत लोखंडी क्रेन पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. नवनाथ भाऊसाहेब गुळवे (वय ३०) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. . याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रणखांब याठिकाणी गुरुवार दि. १० मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुभाष दगडू नायकवाडी यांच्या विहिरीचे काम चालू होते. त्याठिकाणी लोखंडी क्रेनवर चालक म्हणून नवनाथ गुळवे हे काम करत होते. 


अचानक क्रेनचा सेंटर बोल्ट तुटल्याने क्रेनसह गुळवे विहिरीत पडले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन गुळवे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुभाष भाऊसाहेब गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी क्रेन मालक देवराम शिवाजी मनसुख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास परांडे हे करीत आहे. दरम्यान या घटनेमुळे गुळवे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती समजताच माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी गुळवे यांच्या कुटुंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.