खासदार दिलीप गांधींनी मांडली अतिक्रमणाची समस्या !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अहमदनगर जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असून या महामार्गालगतची अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे निर्देश खासदार दिलीप गांधी यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज (गुरुवारी ) राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील कामांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 


जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. दिवाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. वाघ, उपविभागीय अधिकारी सर्वश्री तेजस चव्हाण, श्री. बांदल, उज्ज्वला गाडेकर, अर्चना नष्टे, यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी खासदार गांधी यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या कामांबाबतची सद्यस्थिती समजावून घेतली. काही ठिकाणी कामांचा वेग कमी आहे, तर काही ठिकाणी कामे थांबल्याचे दिसत आहे. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करुन ही कामे सुरु करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कऱण्याचे निर्देश दिले. वेगवेगळया यंत्रणांनी समन्वय ठेवून काम केल्यास अधिक गतीने काम होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय महामार्ग क्र. 50, राष्ट्रीय महामार्ग क्र. 222, राष्ट्रीय महामार्ग क्र. 160, राष्ट्रीय महामार्ग क्र. 160-सी, राष्ट्रीय महामार्ग क्र. 516-अ, , राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-डी, राष्ट्रीय महामार्ग क्र. 752-जी, राष्ट्रीय महामार्ग क्र. 752-ई, राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 आदींबाबत यावेळी बैठकीत आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी कामे धीम्या गतीने सुरु असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबींकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि इतर यंत्रणांनी गांभीयाने लक्ष देण्याची गरज आहे, असे खा. गांधी यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणांकडे लक्ष देण्याची गरज असून जी अतिक्रमणे शासकीय जागेत आहेत, ती तात्काळ काढण्याची सूचना त्यांनी केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.