संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यात यावा, यासाठी सुरू असलेले संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मागे घेण्यात आले आहे.गेल्या ४५ दिवसापासून जिल्हा कृती समितीचे आंदोलन सुरू होते, याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. 



मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, भौगोलिक रचना व लोकसंख्या, प्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.