अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होण्याची शक्यता आहे.जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि संघर्ष कृती समितीचे सदस्य यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 'राज्यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली असून या समितीचा निर्णय आल्यावर विभाजनाचा निर्णय घेऊ' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार हाकणंही अवघड होत असल्यामुळे ही मागणी केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.