सांस्कृतिक महोत्सवाच्या मेगा इव्हेन्टसाठी वाडियापार्क सज्ज !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नगरमध्ये आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक महोत्सव रसिकांना नवे आकर्षण ठरणार आहे.वाडीया पार्कच्या भव्य दिव्य आशा पटांगणात अजय अतुल यांच्या सांगितीक मैफलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी केलेली सजावट संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे.

जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून लेक वाचवा अभियाना अंतर्गत या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी लोणी येथे अजय अतुल यांच्या उपस्थितीत आशाच पध्दतीने संपन्न झालेल्या मेगा इव्हेंटचा आनंद उतर नगर जिल्ह्याने घेतला होता. आता नगर दक्षिण मधील रसिकांना या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून डॉ.सुजय विखे पाटील यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव मिळणार आहे.

जनसेवा फौंडेशन गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवून कार्यरत आहे. महीला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महीलांना विकासाच्या संधी मिळाव्यात यासाठी फौंडेशनचे प्रयत्न आहे. पण याबरोबरच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधन आशा पध्दतीच्या सांस्कृतिक उपक्रमातून करण्यासाठी फौंडेशनचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.

अहमदनगर येथे दि.१९ मे रोजी सायंकाळी पाच वाजता वाडीया पार्कच्या भव्य दिव्य आशा प्रांगणात या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरात प्रथमच आशा पध्दतीचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

वाडीया पार्कचा चेहरा मोहरा या महोत्सवाच्या निमित्ताने बदलण्यात आला असून वाडियापार्क मध्ये दुर्लक्षित झालेल्या सेवा-सुविधा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नानमुळे नवीन रूपात दिसू लागल्या आहेत. सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करून वाडियापार्कच्या वैभवात भर घालण्यात आली असून आकर्षक रंगसंगतीमध्ये अजय अतुल यांच्याबरोबर मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, अभिजित सावंत, स्वप्नील बांदोडकर, इत्यादी लोकप्रिय मराठी कलावंतांच्या उपस्थितीत सांगितिक मैफलीचा आनंद नगरच्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरेल. भव्य दिव्य आशा व्यासपीठावरून रम्य आशा संध्याकाळी... स्वरांची बरसात.. नृत्य कलेचा अविष्कार आणि सोबत कॉमेडी किंग कडून होणारा हास्यकल्लोळ या महोत्सवाची उंची वाढविणारा असेल .

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महीलांचा होणारा सन्मान हे आहे. एकूण सोळा महीलांना जनसेवा फाउंडेशनच्या वतीने गौरविण्यात येणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले. या महोत्सवाच्या निमित्ताने नगर शहरासह जिल्ह्य़ातून येणारे मान्यवर,रसिक याची होणारी गर्दी लक्षात घेता सर्वाच्या बैठकीचे सुयोग्य नियोजन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.