कर्जतमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांसह ९ जणांना जुगार खेळताना अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत येथील शारदा नगरीत जुगार खेळताना 9 जणांना अटक करण्यात आली. यात प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक व प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. येथेप्राथमिक शिक्षकांची शारदा नगरीत वसाहत आहे. बुधवारी दुपारी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना शारदा नगरी वसाहतीत जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली.

यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे, शिपाई सचिन वारे, अमोल मरकड, हवालदार नरसिंग शेलार यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी 9 जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 23 हजार 290 रूपये, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक शरद श्‍यामराव सुद्रिक, राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल लक्ष्मण पवार, प्राथमिक शिक्षक राजेंद्र निवृत्ती सरोदे, शांतीलाल किसन गवारे, संजय आंबादास ठोकळ, राजू शांताराम सकट, गणेश माधव जाधव, परशुराम भिमराव सुपेकर, दादा बाळू कांबळे यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सचिन मधुकर वारे यांनी फिर्याद दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------- .
Powered by Blogger.