नगर अर्बन बँकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर येथील अर्बन बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अहमदनगर येथील एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उदगीर येथील हरिश्चंद्र मरेप्पा नामवाड (६४) रा. नांदेड नाका यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


नगर येथील शिवाजी भिमाजी शेलार याने फिर्यादीच्या मुलास नगर येथील अर्बन बँकेत क्लार्क म्हणून नोकरी लावतो असे अमिष दाखवले. त्यासाठी ५ लाख रुपये घेतले. मात्र नोकरी कांही लावली नाही, आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी शिवाजी शेलार याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्यास अटक करण्यात आलेली नाही. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.