कोहीनूर वस्त्रदालनाची मुहुर्तमेढ रोवणारे वसंतलालजी गांधी यांचा अल्पपरिचय


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कनकमल गांधी यांनी १९३७ मध्ये कापड बाजारात एक छोटे कापडाचे दुकान सुरू केले. त्याच कापडदुकानाचे मोठे दुकान करून वसंतलालजी यांनी कोहीनूर वस्त्रदालनाची मुहुर्तमेढ रोवली. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या वसंतलाल यांनी कापड विक्रीचा व्यवसाय सचोटी,उत्तम ग्राहकसेवा या मूल्यांच्या आधारावर यशस्वीरीत्या चालवला,कोहिनूर चे पहिले नूतनीकरण त्यांनी केले,१९६२ मध्ये कोहीनूर हे दुकान राज्यभरात नावारुपास आणण्यासाठी वसंतलालजी यांनी मोठी मेहनत घेतली. आणि कपडे खरेदी साठी नगर जिल्ह्या बाहेरूनही लोक कोहिनूर मध्ये येवू लागले. बदलत्या काळात ग्राहकांना सेवा देणे, त्यांचा विश्वास जपणे आणि दर्जा सांभाळणे हे तत्त्व वसंतलालजी यांनी सांभाळून ठेवले. त्यांचा आदर्श वारसा त्यांचे पुत्र प्रदीप गांधी आणि नातू अश्विन गांधी पुढे नेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.