अहमदनगर चा 'कोहिनूर' हरपला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहराच्या कापड व्यवसायातील अग्रगण्य असे कोहिनूर वस्ञदालनाचे संचालक वसंतलाल कनकमलजी गांधी (वय ८५) यांचे गुरुवारी (दि.१७) पहाटे साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रदीप, मुलगी जयश्री मोहनलाल मुनोत, नातू अश्विन, नात मधूर जैन, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व. गांधी यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.