अहमदनगर महापालिकेला दोन उपायुक्त मिळणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर महापालिकेची वर्षाखेरीस सार्वत्रिक निवडणूक असल्याने त्यासाठीच्या कामांच्या नियोजनासाठी दोन उपायुक्त शासनाकडून तातडीने मिळण्याची शक्यता आहे. महापौर सुरेखा कदम यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर काही दिवसांपूर्वीच रिक्त जागांवरील नियुक्त्या रखडल्याने होणाऱ्या अडचणींची मांडणी केली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने किमान दोन अधिकारी तरी नगरला पाठवण्याची ग्वाही म्हैसकर यांनी दिली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा मनपाला आहे.

पूर्णवेळ आयुक्त तसेच दोन उपायुक्त, शहर अभियंता, सहायक आयुक्त व लेखाधिकारी या पदांवर सरकारकडून तातडीने अधिकारी देण्याच्या मागणीसाठी महापौर कदम यांनी प्रधान सचिव म्हैसकर यांची भेट घेतली. या वेळी उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनीता मुदगल, सभागृह नेते गणेश कवडे, दत्ता मुदगल आदी त्यांच्यासमवेत होते.

महापालिकेत पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी नसल्याने येणाऱ्या प्रशासकीय कामकाजातील अडचणींची मांडणी या वेळी करण्यात आली.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ८-९ महिन्यांवर आली आहे, केंद्र व राज्य सरकारच्या कोट्यवधीच्या योजनाही शहरासाठी मंजूर आहेत, अन्य विकासकामेही प्रस्तावीत आहेत, पण केवळ महापालिकेमध्ये वरिष्ठ अधिकारी सरकारने दिले नसल्याने शहराच्या विकासकामांवर परिणाम झाला आहे, अशी व्यथा मांडली गेली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.