सुपा एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला आग

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे महामार्गावरील सुपा एमआयडीसीतील (औद्योगिक वसाहत) एका प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या गोदामाला बुधवारी (१६ मे) सायंकाळच्या सुमारास आग लागली. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.सुपा एमआयडीसीत सुमारे २ हजार चौरस फूट जागेत एक प्लास्टिकचे कच्चा माल असलेले एक गोदाम आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या गोदामामधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे लक्षात आले. 


सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी सुपा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. अहमनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. घटना घडल्यानंतर सुमारे तासाभराने नगर महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. गोदामामधील प्लास्टिक पेटल्याने परिसरात अतिशय उग्र वास येत होता. कडक ऊन व वाऱ्यामुळे आग आग अधिकच फोफावत होती. या गोदामाचे मालक दिल्लीला राहत असल्याने गोदामामध्ये नेमके इतर काय साहित्य आहे व आगीत किती नुकसान झाले या बाबतची निश्चित माहिती मिळू शकली नाही. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.