सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांनी बुधवारी दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ज्या मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती परीक्षेला शंभर टक्के विद्यार्थी न बसवणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अशी ही सूचना त्यांनी दिली. 


जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीचे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, उज्ज्वला ठुबे, विमल आगवण, राहुल झावरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यावेळी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रचारावर भर देण्याची सूचना सभेत करण्यात आली. तक्रारपेटी न बसवलेल्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाईची सूचनाही देण्यात आली. जे शिक्षक सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.