दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील राळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद गायकवाड याच्यासह त्याच्या नातलगांनी तालुक्यातील तेलंगसी या गावात 20 मार्च रोजी गॅबीसाहेब पिराचे यात्रेत रात्री हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. तेलंगसीचे सरपंच सुभाष जायभाय यांनी दोन महिन्यानंतर 15 मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जामखेड पोलिसांत तेलंगसी गावचे सरपंच सुभाष निवृत्ती जायभाय (वय 56) यांनी दि. 15 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, 20 मार्च रोजी तेलंगसी गावातील वेशीजवळील चौकात गॅबीसाहेब पिराचे यात्रेतील ऊरूसाच्या मिरवणुकीत आरोपी गोविंद उर्फ स्वामी दत्तात्रय गायकवाड नाचत असताना त्याने त्याच्या जवळील गावठी पिस्तुलातूून हवेत गोळीबार करून मी या गावचा दादा आहे, असे म्हणून इतर आरोपी गोरख दत्तात्रय गायकवाड (गोविंदचा भाऊ) व दत्तात्रय रंगनाथ गायकवाड (गोविंदचा वडील) यांनी नाचत गोविंद गायकवाडचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, त्याने कसा फायर केला असे बोलून दहशत करून चारचाकी गाडीतून निघून गेले, अशी फिर्याद सुभाष जायभाय यांनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आर्म अ‍ॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.