पुणे -नगर महामार्गावर एसटीची टेम्पोला धडक; एक ठार ,आठ जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील पुणे -नगर महामार्गावरील सुप्यानजीक पवारवाडी येथे एसटीने टेम्पोला धडक दिल्याने टेम्पेातील एक लहान मुलगी ठार झाली तर इतर ८ ज़ण ज़खमी झाले. हा अपघात मंगळवार, दि. १५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- दि. १५ रोजी केशव विश्वनाथ गायकवाड वय -४० रा. नायगाव ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद, हे एम.एच. २० डीई ६६४६ या टेम्पोतून ऊसतोडणी कामगारांना पारगाव, ता. दौंड जि. पुणे येथे लग्नाला घेऊन जात होते. हा टेम्पो सुप्याजवळील पवारवाडी येथे आला असता, पाठीमागून आलेल्या एम. एच.१४ बीटी २१६७ या एसटीने त्यांच्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने टेम्पो उलटला.

या वेळी झालेल्या अपघातात टेम्पोतील ३ वर्षांची लहान मुलगी रुपाली विलास सोनवणे रा. अंधारवाडी, ता. कन्नड जि. औरंगाबाद ही ठार झाली तर आकाश संजय सोनवणे (वय २२), रा. नायगाव ता., फुलंबी जि. औरंगाबाद, पुजाबाई बाजीराव सोनवणे (वय ५०), पवन बाजीराव सोनवणे (वय ७), पल्लवी बाजीराव सोनवणे, (वय ५), परविन बाजीराव सोनवणे (वय ३), मंगल सुभाष सोनवणे, (वय ३०) सर्व रा. सुलतानपूर, ता. खुलदाबाद जि. औरंगाबाद, सुनीता हरिश्चंद्र बर्डे, (वय २६), रा. लोणार नायगाव, ता. अंबड, जि. जालना, वनिता विलास राजपूत, (वय २२) रा. अंधारवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद हे ८ जण गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. टेम्पोचालक केशव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. साहेबराव आहोळ करीत आहेत

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.