विवाहितेचा मारहाण करून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विवाहितेचा मारहाण करून छळ केल्याप्रकरणी निर्मलनगर येथील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी कि दिपाली अनिल बोरगे (रा.डोकेनगर शाळेजवळ ,साईमंदिराशेजारी निर्मलनगर ) ही ला मागील भांडणाच्या कारणावरूण पती अनिल हनुमान बोरगे,सासरे हनुमान सखाराम बोरगे, सासु मैनाबाई हनुमान बोरगे ,नणंद सुवर्णा हनुमान बोरगे ,सुनील उर्फ सुरेश हनुमान बोरगे (रा.सदर ) यांनी विवाहिता तीच्या घरात काम करीत असतांना दि.15 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तु आमच्या विरूध्द तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार का केलीस असे म्हणुन फिर्यादीस लाकडी दांडक्‍याने हातावर ,पायावर ,पाठीवर मारहाण व आरोपी सुवर्णा बोरगे हिने केस ओढून शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी विवाहितेला दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी उपचार सुरू असतांना दिलेल्या जबाबावरून पती ,सासु,सासरे, नणंद, दिर यांच्या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्सटेबल शिरसाठ हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.