एकाच दिवशी तीनजणांचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे एकाच दिवश तीन जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याबाबतची माहिती अशी की, बुधवार, दि. १६ मे रोजी शिरापूर येथील नामदेव भाऊ लोमटे (वय ९१ वर्षे) यांचे निधन झाले, त्यानंतर काही वेळाने दत्तात्रय बाळाजी शिंदे (वर्य ८१ वर्षे) यांचे निधन झाले. तर दुपारच्या सुमारास हौसाबाई मारुती बुथवंत (वय ८८ वर्षे) या सर्वांचे वृध्दापकाळाने निधन झाले. एकाच दिवशी आणि काही तासांच्या अंतराने गावातील या तीन जणांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.