आरोपी अनिल राठोड यांना अटक करण्याचे धाडस पोलीस करणार का?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी तथा शिवसेना कार्यकर्ते आतपर्यंत शहरात उजळ माथ्याने फिरत होते. परंतु आता हेच आरोपी चक्क पोलिसांबरोबर दिसून येत आहेत. हत्याकांडातील मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटूंबियांच्या वतीने सुरू असलेल्या उपोषस्थळी मंगळवारी दुपारी हे चित्र दिसून आले. अपर पोलिस अधीक्षक पाटील यांनी उपोषकत्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यावेळी तेथे चक्क दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल असलेले आरोपी राठोड, सातपुते व कदम उपस्थित होते. 


शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल असूनही वरिष्ठ पोलिस अिधकारी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याच राठोड यांना मात्र तत्कालीन पोिलस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली होती. राठोड यांनी अतीक्रमणे हटवण्यास विरोध केला होता. केडगाव दगडफेक प्रकरणी कृष्णप्रकाश यांच्यासारखी खमकी भूमिका घेत आताचे पोलिस राठोड यांना अटक करण्याचे धाडस करतील का? अशी चर्चा शहरात सुरु आहे. सोशल मीडियावरही ही चर्चा जोरदार सुरु आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.