हेलिकॉप्टर कोसळल्याच्या क्लीपने नेवासे तालुक्यात खळबळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :हेलिकॉप्टर कोसळल्याच्या व्हिडीओ क्लीपने बुधवारी नेवासे तालुक्यात  खळबळ उडवून दिली. नेवासेफाटा परिसरात सकाळी ११ च्या सुमारास हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. नेवासे शहराकडे जाणाऱ्या चौकात पूजा फास्टफूड हॉटेल आहे. या हॉटेलसमोर हेलिकॉप्टर कोसळून ३ ठार व ७ जण जखमी झाल्याची व्हिडीओ क्लीप व्हॉट्सअॅपवर दिवसभर फिरत होती. 


ज्यांनी ही क्लीप पाहिली, त्यांनी नेवासे पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, नातेवाईक, मित्रमंडळ व पत्रकारांशी संपर्क साधला. सकाळपासून सुरु झालेला सिलसिला रात्री उशिरापर्यंत चालू होता. पत्रकारांनी पोलिस निरीक्षक व तहसील कार्यालयात विचारणा करून खात्री केली असता पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे व नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनाही त्यांच्या वरिष्ठांनी फोन करून चौकशी केल्याचे समजले.हा संगणकीय खोडसाळपणा असल्याचे व्हिडीओ नीट पाहिल्यावर स्पष्ट झाले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.