केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो तपास गुन्हे अन्वेशन विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरिक्षक प्रभात कुमार यांनी दिली आहे.

केडगाव येथील हत्याकांड घडून साधारण दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. या दुहेरी हत्याकांडाचा तपास जलद गतीने लागत नसल्यामुळे सदरचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मंगळवारी येथील जिल्हा पोलीस प्रशासनाने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर तो राज्य सरकारकडे दाखल करण्यात आला होता.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.