फ्लेक्स लावून भाई होतोस काय? म्हणत नगर मध्ये युवकास बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :फ्लेक्‍स वर फोटो लावण्याच्या कारणावरून नालेगाव येथे एकाला चारजणांनी हाणामारी केल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर  माहिती अशी कि फिर्यादी आनंद प्रल्हाद गिते (रा. झारेकर गल्ली,कन्या शाळे मागे,अ.नगर ) हा तरूण दि 15 मे रोजी नालेगाव येथील सातपुते तालीमजवळ दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरील व्हॉटसअप चेक करीत बसलेला असतांना मोटारसायकल वरून आरोपी भाऊ संभाजी अनभुले (रा. रक्तदान पेढीजवळ,अमित अपार्टमेंट ) शिवाजी संभाजी अनभुले (रा.कुंभारगल्ली ,अ.नगर ), सोनु राजेंद्र दातरंगे ( रा.नेप्तीनाका लाकाडाच्या वखारी जवळ ,अ.नगर ) व प्रतिक भोर (रा. नानापाटील वस्ताद तालमीजवळ ,अ.नगर ) या चौघांनी तेथे येवून फिर्यादीस तुझे होर्डींगवर मोठे फोटो लावलेले असतात. जास्त फार्मात येवू नकोस,नालेगावचा भाई होतोस काय? असे म्हणत फिर्यादीस धारदार वस्तुने डोक्‍यात मारत लाथाबुक्कयांनी छातीत मारले,तसेच आरोपी प्रतीक भोर याने दगडाने मारहाण करून फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील 720 रूपये बळजबरीने काढून घेत शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.