भिंगार मध्ये अपघातात युवक ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगार येथील बेल्हेश्‍वर मंदिराजवळ टेम्पो धडकेत भिंगार येथील 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली, या बाबत माहिती अशी दि 14 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो नंबर एम एच 06 जी 7502 याने बेल्हेश्‍वर मंदीराजवळ भिंगार येथील भिमनगर येथे राहणारा मयत मयुर अशोक भिंगारदिवे हा त्याच्या गाडीवरून नगरकडून भिंगार कडे येत असतांना समोर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीस गंभीर दुखापत झाल्यामुळे फिर्यादीचा मृत्यु झाला. या प्रकरणी टेम्पो चालक अरूण सुरेश हजारे (रा.सारोळाबद्दी,ता.जि.अ.नगर ) याच्या विरूध्द मयत मयुर भिंगारदिवे याचा भाऊ पवन अशोक भिंगारदिवे यांने दाखल केलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.