गृहरक्षक दलाच्या जवानाने चोरले होते 'ते' पोलिसांचे पिस्तूल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव येथील पोलिस ठाण्याच्या शस्त्रागारातून दोन महिन्यांपूर्वी गायब झालेल्या ९ एमएम पिस्तुलाची चोरी करणाऱ्यास मोटारसायकलीवरून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून राजेश अशोक कोलते (चापडगाव) याला पोलिसांनी सोमवारी पहाटे अटक केली. मुख्य आरोपी गृहरक्षक दलाचा जवान सतीश दिलीप नेमाणे (चापडगाव) फरार आहे.

पिस्तूल गायब झाल्याचे १८ मार्चला उघडकीस आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी पोलिस ठाण्यात येऊन सविस्तर चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पिस्तुलाचा शोध घेण्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. मात्र, तपासात प्रगती नसल्याने पोलिस नाईक राजेंद्र केदार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती.

तालुक्यातील चापडगाव येथील गृहरक्षक दलाचा जवान सतीश नेमाणे याने पोलिसांचे पिस्तूल चोरल्याचे समजले. त्याच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी पिस्तूल हस्तगत केले. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
या घटनेचा पुढील तपास प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे व सहायक पोलिस निरीक्षक नितीन मगर करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.