अकोले तालुक्‍यात बिबट्याचा बालकावर हल्ला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्‍यातील कळस बुद्रूक येथे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांचे बालक जखमी झाले तनेश सचिन कर्पे असे जखमी मुलाचे नाव आहे. तनेश घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. त्याच्या डोळ्याजवळ बिबट्याच्या पंजाच्या जखमा झाल्या आहेत.


तनेशची आई, मावस आजी या अचानक झालेल्या प्रकाराने गोंधळल्या. बालकाची आई अनिता कर्पे व मावस आजी चहाबाई वाळे यांनी बिबट्यावर दगड-गोटे फेकले. या वेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक धावले आणि बिबट्याने धूम ठोकली. अकोले येथे प्राथमिक उपचार करून संगमनेर येथील खासगी दवाखान्यात तनेशला दाखल करण्यात आले.

तनेशच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला बिबट्याने पंजा मारला आहे. त्याला दहा टाके टाकण्यात आले. त्याचे सीटी स्कॅनही करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप कुटे यांनी सांगितले. बालकावरील बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात दहशत पसरली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.