केडगाव दुहेरी हत्याकांडापूर्वी संदीप गुंजाळ भानुदास कोतकरला भेटला.



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव दुहेरी हत्याकांडापूर्वी दोन महिने अगोदर या गुन्ह्यातील आरोपी संदीप गुंजाळ व आरोपी भानुदास कोतकर यांची पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरात भेट झाल्याची माहिती आरोपी नगरसेवक विशाल कोतकरने पोलिस तपासात दिल्याची बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी न्यायालयात मांडली.

केडगाव दुहेरी हत्याकांडातील गुन्ह्यात अटक असलेला काँग्रेसचा बडतर्फ जिल्हा शहराध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची (१९ मेपर्यंत) पोलिस कोठडी देण्यात आली. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी हत्या घडविणारा आरोपी संदीप गुंजाळ हा शिरुर येथे भानुदास कोतकरला भेटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.