भानुदास कोतकरला मिळणार घरचे जेवण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव दुहेरी हत्याकांडातील गुन्ह्यात अटक असलेला काँग्रेसचा बडतर्फ जिल्हा शहराध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर याला मंगळवारी न्यायालयाने पाच दिवसांची (१९ मेपर्यंत) पोलिस कोठडी दिली. कोतकरला घरचे जेवण देण्याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

पोलिस कोठडीत घरचे जेवण मिळावे, यासाठी कोतकर याने वकिलामार्फत न्यायालयाकडे अर्ज केला. कोतकर आजारी अाहे. अशोक लांडे खूनप्रकरणात त्याला आजारपणाच्या कारणामुळेच जामीन मिळालेला आहे. पुण्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीचा विचार करून पोलिस कोठडीत त्याला घरचे जेवण पुरवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.