कर्जाला कंटाळून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील धोत्री येथील कचरू किसन अडाले (५० वर्षे) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. मुलगी लग्नाला आली असल्याने तिचे लग्न कसे करणार या विवंचनेत कोणासही न सांगता सकाळी ११ वाजता अडाले यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्यांच्यामागे वृद्ध आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार अाहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Blogger द्वारा समर्थित.