साई संस्थानच्या बसला अपघात 13 साईभक्‍त जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईबाबा संस्थानच्या प्रवासी वाहतूक बसला मालवाहू ट्रकने धडक दिली. या अपघातात तेलंगणा, कर्नाटक राज्यातील 13 साईभक्‍त जखमी झाले. यातील 65 वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या सर्व साईभक्तांना साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.साईबाबा संस्थानची प्रवासी वाहतूक करणारी बस क्रमांक एम.एच. 17 ए.जी. 9747 सोमवारी (दि. 14) सायंकाळी शिर्डीतून नगरसूल रेल्वे स्टेशनला साईभक्तांना घेऊन जात असताना येवला टोल नाकाच्या पुढे शिर्डीच्या दिशेने समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक एच.आर. 55 डब्ल्यू 0774 या गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळे ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट साईबाबा संस्थानच्या बसवर येऊन धडकली.

या घटनेत बसमधील एकूण 28 साईभक्तांपैकी 13 साईभक्त व साईबाबा संस्थानचा बसचालक जखमी झाला आहे. अपघाताची खबर मिळताच तातडीने संस्थानच्या रुग्णवाहिका पाठवून जखमी साई भक्तांना साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कर्नाटक येथील साईभक्त महिला भाग्यमा यांच्या डोक्‍याच्या पुढील भागात बसचा रॉड घुसल्याने त्यांना जबर दुखापत झाली. त्यांची प्रकृती चिंताजनक असून एकूण 10 रुग्णांना अत्यावश्‍यक आंतररुग्ण उपचारासाठी दाखल केले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.