श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारात अपघात एक ठार, दोघे गंभीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव रस्त्यावर आढळगाव शिवारात रात्री आठच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील भरत आगलावे हा दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढवळगाव येथील भरत आगलावे , मयूर वेताळ आणि राजू वेताळ हे तिघे आपल्या दुचाकीवरुन (एमएच १६ एडब्लू- १०१८) जामखेड येथे निघाले होते. आढळगाव येथील सिध्देश्वर मंदिरानजिक असणाऱ्या पुलावरुन दुचाकी पुढे गेली त्याच दरम्यान समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली. 

ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीसह दुचाकीवरील तिघेजन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्यात उडून पडले. यात भरत आगलावे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. आढळगाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्ताना खड्यातून बाहेर काढून त्यांना रूग्णवाहिकेतून श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.