चोरी ते मारहाण,दंगल,खूनाचा प्रयत्न....भानुदास कोतकरवर गंभीर स्वरुपाचे तब्बल २८ गुन्हे.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याप्रकरणात अटक असलेल्या भानुदास कोतकरविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, अपहरणाचे असे गंभीर स्वरुपाचे तब्बल २८ गुन्हे असून, केडगाव हत्येचा गुन्हासह त्याच्याविरुद्ध पारनेर, कोतवाली पोलिस स्टेशनला पाच खूनाचे गुन्हे आहेत. यातील बारा गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. तर काही गुन्हे प्रलंबित आहेत.

कोतकरविरुद्ध पहिला गुन्हा १९८८मध्ये पारनेरमध्ये दाखल झाला होता. तो गुन्हा चोरीचा होता. तेंव्हापासून ते २०१८ पर्यंत त्याच्याविरुद्ध २८ गुन्हे दाखल झाले आहेत. पारनेर पोलिस स्टेशनला दोन, तर नगर तालुका पोलिस स्टेशनला ९, कोतवाली पोलिस स्टेशनला सर्वाधिक १५, एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक असे गुन्हे आहेत.

कोतवाली पोलिस स्टेशनला १९८६ मध्ये हत्येचा पहिला गुन्हा दाखल करण्यात झाला होता. पारनेर पोलिस स्टेशनला १९८८ ला, कोतवाली पोलिस स्टेशनला १९८९, २००६ असे चार खूनाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे कोतकर याची दहशत वाढली होती. खूनाच्या गुन्ह्यांबरोबर दोन खूनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल होते. 

याचबरोबर अपहरण करून मारहाण करणे, दरोडा, चोरी, सरकारी कामात अडथळा आणणे, दंगली करणे असे गुन्हे दाखल झाले. भानुदास कोतकरने केडगाव सरपंचपद, बाजार समिती सभापतीपद भूषविले. काँग्रेसचा शहराध्यक्ष होऊन नगर शहरातील राजकारणात आला. मुलगा संदीप कोतकरला महापौर केले होते. गुन्हे दाखल असले तरी अटक होऊन शिक्षा झाली नव्हती. 

मात्र, केडगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खूनप्रकरणात कोतकर व त्याच्या मुलांना अटक होऊन जन्मठेपेची शिक्षा झाली. केडगावमधील शंकर राउत यांनी कायदेशीर प्रक्रिया करत पाठपुरावा करत कोतकरला शिक्षेपर्यंत नेले. शिक्षा झाल्यानंतर आजारपणामुळे कोतकर हा जामिनावर बाहेर आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर केडगावला दुहेरी हत्याकांडातील गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर त्याला अटक झाली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.