मोलकरीणीनेच केली सोन्याच्या दागिण्यांची चोरी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव परिसरातील भुषणनगर भागात घरकाम करणाऱ्या मोलकरीणीकडून सोन्याचे दागिणे चोरण्याची घटना घडली फिर्यादी मंगल कल्याण अनभूले (रा.केडगाव ,भुषननगर, जगदंब अपार्टमेंट ) यांच्या घरामध्ये घरकाम करणारी मोलकरीण रूक्‍मीणी मधुकर शिंगटे हिने दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घरी धुणे भांडी करण्यासाठी आलेली असतांना घरातील बेडरूम मधील 45 हजार रूपयांच्या तीन तोळयाच्या सोन्याच्या बांगडया व 10 हजार रूपयाचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याप्रकरणी आरोपीविरूध्द दाखल केलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.