चाळीस लाखांचा अपहार करणारा कर्मचारी पंचायत समितीत हजर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड पंचायत समितीतील मयत सेवानिवृत्त पेन्शनधारकांची रक्कम अपहार करणारा कर्मचारी वैभव आमले मंगळवारी पंचायत समितीत हजर झाला आहे.जामखेड पंचायत समितीतील सामान्य प्रशासन विभागातील या कर्मचा-याने मयत सेवानिवृत्त पेन्शनधारकांची जवळपास 40 लाख रक्कम हडप केली आहे.


याबाबतच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे पाच सदस्यीय पथक आले आहे. त्यांनी संबंधित कर्मचा-याचे लेखी घेऊन दप्तर ताब्यात घेतले.हा कर्मचारी दोन दिवस फरार होता. याबाबत जिल्हा परिषदेने त्रिसदस्यीय समिती नियुक्‍त केली होती. 

त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याचे कपाट सिल केले होते. गटविकास अधिकारी अशोक शेळके यांनी जिल्हा सहकारी बॅंकेच्या शाखेला पत्र देऊन माहिती मागितली होती. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला. संबंधित कर्मचा-याकडून रक्कम वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.