...तर माझ्या मृत्युला महापालिका व जिल्हा प्रशासन जबाबदार!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील चौकात उभे असलेले बंद सिग्नल सात वर्षांपासून बंद आहेत. यामुळे शहरात आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. अनेकांचा बळी देखील गेला आहे. वाहतूक नियोजनासाठी हे सिग्नल सुरू करावे यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहेत. तरी देखील ते सुरू झालेले नाहीत. बंद सिग्नलमुळे शहरातील रस्त्यांवर अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्याला महापालिका व जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असे मृत्यूपत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले आहे. 


या मृत्यूपत्राची एक पत्र त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भेटून दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिली प्रत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा शहरातील बंद सिग्नल सुरू व्हावेत यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी निवेदन, पत्र व्यवहार आणि आंदोलने देखील झाली आहे.

शहरातील रस्त्यावरील सिग्नलची माहिती देखील त्यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली. तेथील अपघाताची संख्या देखील माहिती अधिकारात उघडकीस आणली. या प्रकरणी सध्या, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. तसा अर्ज देखील न्यायालयासमोर सादर झाला आहे. त्यावर तारीख पडून सुनावणी होणार आहे, असा दुजोरा सुमित वर्मा यांनी दिला.

दरम्यान, सुमित वर्मा यांनी शहरातील बंद सिग्नलकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आता मृत्यूपत्र तयार केले आहे. या मृत्यूपत्रात आपण शहरात २७ वर्षांपासून वास्तव्याला आहोत. शहरातील बंद सिग्नल अभावी अपघातात मृत्यू झाल्यास त्याला महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी राहतील, असे स्पष्ट म्हटले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.