राहुरी शहरातील 'त्या' मुलाचा मृतदेह सापडला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी शहरातील काळे आखाडा येथील ८ वर्षाचा सार्थक मधुकर डुक्रे हा चौथीत शिकणारा मुलगा काल दुपारी मुळा डावा कालव्यात पडून वाहून गेला होता. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नगर मनमाड रस्त्यानजिक हॉटेल आकाशजवळ तो मृतावस्थेत सापडला. त्यास ग्रामीण रुग्णालय येथे तपासणीसाठी आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. 

काल दुपारी ३च्या सुमारास काळे आखाडा येथील मुळा डावा कालव्यात पोहण्यासाठी काही मुलांसमवेत गेला होता. यावेळी तो कालव्यात पडला. मुलगा कालव्यात पडल्याचे समजताच काळे आखाडा येथील नागरीक व त्याच्या घरच्यांसह माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, संदीप भोंगळ, गोपीनाथ काळे व अन्य नागरिकांनी त्याचा शोध घेतला. कालवा २५० क्युसेक्सने वाहत होता. मुलाचा शोध घेण्यासाठी तातडीने मुळा पाटबंधारे खात्याशी संपर्क करून कालवा तात्पुरता बंद करण्यात आला व शोध मोहिम सुरू करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.