विखे,काळे,कोल्हे या दिग्गज मातब्बरांवर आ.बाळासाहेब थोरातांचा निशाणा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणतांबा गाव विखे, काळे, कोल्हे या दिग्गज नेत्यांच्या कार्यक्षेत्रात येते. गावाची दुरवस्था बघून विकासाच्या बाबतीत या गावात बदल का झाला नाही, याबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी टिपणी करून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी या मातब्बरांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या आहेत.


दरम्यान, गटबाजीचे दाखले देऊन ‘आम्हाला कोणी वाली नाही’, असा सूर उमटल्यावर ‘पुणतांबेकरांनो एकत्र व्हा, म्हणजे सर्व ‘वाली’ इकडे धावत येतील’, असा सल्ला देत त्यांनी या मातब्बरांवर निशाणाही साधला.पुणतांबा येथे राजवर्धन थोरात युवा फाउंंडेशनची शाखा सुरू होत असल्याने आधीच परिसरात दबक्या आवाजात कुजबुज सुरू होती. 

विखे, कोल्हेंच्या प्रभावक्षेत्रात आ. थोरात काय बोलणार याचीही उत्सुकता होती. गंमत म्हणजे दोन दिवसांपूर्वी येथे ना. राधाकृष्ण विखे यांनी एक जंगी कार्यक्रम घेतला. त्याच्या दुसर्याच दिवशी आ. थोरात दाखल झाले होते.मात्र हा दौरा पुर्वनियोजित होता, असा थोरात समर्थकांचा दावा होता. आ.थोरात यांच्या हस्ते राजवर्धन युवा फौंडेशनच्या फलकाचे अनावरण झाल्यानंतर बाबासाहेब चव्हाण यांच्या वस्तीवर आयोजित बैठक झाली. 

आ. थोरात म्हणाले, 17 हजार लोकसंख्या असलेले पुणतांबा ऐतिहासिक व धार्मिक परंपरा असलेले गाव आहे. शेतकरी संपाची सुरुवात करणार्या या गावाचा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक झाला. मात्र गावातील रस्त्यांची अवस्था बघून मी थक्क झालो.

यावेळी भाषणांमधून काहींनी पुणतांब्याला कोणी ‘वाली’ नाही, अशी भावना व्यक्त केली होती. तो धागा पकडून पुणतांबा येथील राजकीय स्थितीचा संदर्भ देत आ.थोरात यांनी पुणतांबेकर आपल्या विकासाच्या प्रश्नावर एक झाले तर राजकारणातले सर्व ‘वाली’ इकडे धावत येतील, अशी कोपरखळी मारली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.