आजाराने 'बेजार' भानुदास कोतकर कोठडीतील आयुष्याला कंटाळला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एकेकाळी नगर शहरावर अधिराज्य गाजवणारा अहमदनगर काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर याला विविध आजारांनी 'बेजार' केले आहे.अशोक लांडे या लॉटरी विक्रेत्याच्या खून प्रकरणात कोतकरला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तेव्हापासून कोतकर केडगावच्या घरातून गायब आहे. राजेशाही थाटात वावरण्याची सवय असलेला भानुदास कोतकर कोठडीतील आयुष्याला कंटाळला आहे.


सहा वर्षापूर्वीचा भानुदास कोतकर आणि आजचा भानुदास कोतकर यात जमीन अस्मानचा बदल झाला आहे. कमी झालेले वजन वजन, म्लान झालेला चेहरा त्याच्या बदललेच्या रूपाची साक्ष देत होता. त्याकाळी असलेला रूबाब, ऐट आज मात्र दिसत नाही. त्याचा सगळा रुबाब उतरला आहे.

सोमवारी सकाळी येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आला असताना भानुदास कोतकरला ताब्यात घेतले मात्र अटकेसाठी हवे असलेले फिटनेस घेण्यासाठी पोलिसांनाही तब्बल 24 तास वेटींग करावे लागले. फिटनेस मिळताच पोलिसांनी केडगाव हत्याकांड प्रकरणात अटक केली.
                                           

पोलिसांच्या चौकशीनंतर त्याला फिटनेससाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. त्यापूर्वी त्याने आजाराची फाईल्स पोलिसांना दाखविली. नगरला त्याचे फिटनेस मिळाले नाही. त्यामुळे पुण्याच्या रुग्णालयता त्याचे फिटनेस तपासणी करण्यात आली.

सहा वर्षांपासून कोतकर कोठडीत असून याच काळात त्यांना शारीरिक व्याधी सुरू झाल्या. शुगर, बीपी या त्रासासोबतच त्यांच्या पोटाचेही ऑपरेशन झालेले आहे. तोंडाच्या आजारानेही त्यांना घेरले आहे. तोंडात मशीन घालून त्यांना संवाद साधवा लागतो. पोलिसांशी संवाद साधताना त्यांना मशीनचा वापर करावा लागला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.