आमदार राहुल जगताप यांनी चार वर्षांत कोणते भरीव काम केले ? - पाचपुते

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनतेने चार वर्षांपूर्वी ज्यांना विकास करण्यासाठी निवडून दिले, त्यांनी विकास केला नाही. उलट तालुक्याच्या प्रगतीचा आलेख खुंटला, तरी जाहिरातबाजी करत सांगतात की, तालुक्याचे ते आधारवड आहेत. हे आता सर्वांनी समजून घेतले पाहिजे, अशी टीका जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिव पाचपुते यांनी केली. 


भीमानदी - काठी असलेल्या गार गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन  समारंभ माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदाशिव पाचपुते बोलत होते.आमदार राहुल जगताप यांच्यावर टीका करताना पाचपुते म्हणाले, लोक त्यांना कार्यसम्राट पदवी देऊन प्रसिद्धी मिळवतात. त्यांनी मागील चार वर्षांत कोणते भरीव काम केले. दुसऱ्याने केलेल्या कामाचे आयते श्रेय त्यांनी घेऊ नये.

अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक रघुनाथ नायकवडे होते. कार्यक्रमाला माजी सरपंच श्रीकांत मगर, उपसरपंच नंदा पवार, सुनील मगर, बाळासाहेब पवार, बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे, गणपत परकाळे, अशोक मचाले, श्रीधर देशमुख, गणेश मचाले, हरिभाऊ शेळके, गोरख मगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.