श्रीरामपूर तालुक्यात लग्नात वऱ्हाडींना शस्त्राच्या धाकाने धमकावले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे एका लग्न समारंभात शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली तसेच पोलिसांना विरोध करून सरकारी कामात अडथळा आणला, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


टाकळीभान येथील एका लग्न समारंभात टाकळीभान येथीलच महंमद समशेरखान पठाण, अश्पाक बशीर बेग, रईस शेख, अजिज शेख, इकबाल ऊर्फ सोनू सिकंदर शेख व इतर काही अनोळखी इसमांनी लग्नातील वऱ्हाडी मंडळींना ताजमहंमद नुर पठाण यांच्या ताब्यातील स्कुल बसचे नुकसान का केले, याचा जाब विचारण्यासाठी आपल्याकडील तलवारी, गज, काठ्या घेऊन धमकाविले व त्या ठिकाणी दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनाही विरोध करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, आर्म ॲक्ट ४/२४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१), (३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.