दूध भाव व दुष्काळ निधी बाबत लोकप्रतिनिधी गप्प का? - शंकरराव गडाख


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : दुधाला भाव, संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल,  माफीसह नेवासा तालुक्या तील बोंड आळीचे अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांकडे सरकारचे दि.14 मे रोजी नेवासा तालुका शेतकरी सुकाणू समिती आणि क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या वतीने सविनय कायदेभंग करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी शंकरराव गडाख यांच्यासह अनेकांना पोलिसानी अटक करून सुटका केली
माजी आमदार शंकरराव गडाख , सुकाणू समितीचे ऍड बन्सी सातपुते , कॉम्रेड बाबा आरगडे , आरपी आय चे अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी नेवासा बस स्थानक पासून मोर्चाने तहसील कार्यालयात गेले त्यावेळी सरकारच्या विरोधात मोठ्या घोषणा देण्यात आल्या .

यावेळी कॉम्रेड बाबा आरगडे , सुकाणू समितीचे बन्सी सातपुते , शेतकरी संघटनेचे जगगनाथ कोरडे , हरिभाऊ तुवर, नागेश आघाव , बाबासाहेब खराडे , वामनराव तुवर यांच्यासह अनेकांनी आपल्या भाषणात सरकारवर चॉफेर टीका केली . नायब तहसिलदार ज्योती प्रकाश जायकर यांना लेखी निवेदन देण्यात आले .

यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेऊन आपण एकत्रित येऊ या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या परंतु सतेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्ज माफीची घोषणा करतांना अनेकदा जि आर बदलले गेले .हजारो शेतकरी येथे आले आहे पण तहसीलदार यांना शेतकऱ्यांसमोर आले नाही त्यांना येथे येण्यासाठी लाज वाटते की काय ? 

नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांचे अनेक आंदोलन झाली साल 2015 -16 सालचे दुष्काळी अनुदान जाहीर झाले 114 गावातील सुमारे 50 हजार शेतकरी पात्र होते सरकारने 75 हजार हेक्टरवर सर्वे केला ते 54 कोटीचे अनुदान मिळाले नाही फक्त घोषणा केल्या गावागावात फ्लेक्स लावले सुमारे 16400 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यापैकी फक्त 4000 शेतकऱ्यांना 100 - 200 रुपायचे अनुदान देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली. 

मागील वर्षी बॉंड आळी चे अनुदान जाहीर केले त्याचेही अजून काही झाले नाही . 126 गावातील 22 हजार हेक्टरवर सुमारे 32545 शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे होते पण मिळाली नाही .तुरीचे उत्पादन जास्त झाले त्यावेळेस शेतकऱ्यावर 3000 ते 3500भावाने विकण्याची वेळ आली .हरबार्याचीही तीच अवस्था आहे हमीभाव 4400 ठरला पण त्याचीही अवस्था तुरी सारखी झाली .सरकारविरोधात मोठी लढाई लढवावी लागणार आहे शेतकऱ्याच्या हितासाठी आपण नेहमी पुढे राहणार आहोत.

पोलीस अधिकारी , तहीलसीलचे कर्मचारी यांना शेतकऱ्यांनी दूध पाजले . पोलीस उप विभागीय अधिकारी अभिजित शिवथरे , नेवासा पोलीस ठाण्याचे प्रवीण लोखंडे , सहायक पोलिस अधिकारी किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवला.

कॉम्रेड बाबा आरगडे म्हणाले की शासनाचे धोरण चुकीचे आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे .पाकिस्तानची साखर भारतात आणली गेली त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे कारण बाहेरची साखर आल्याने साखरेचे भाव कमी होऊन उसाला भाव कमी मिळतो . हे सरकार लेखी देऊनही पुर्तता करत नाही .

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.