श्रीगोंद्यातील तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यावरील राहाणारा महेश राजू चव्हाण. (वय २२ वर्षे) या तरुणाचा आज दुपारी श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीगोंद्यात शोककळा पसरली आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी, महेश हा आज दुपारी तीन वाजता मित्रांसोबत या महाविद्यालयात पोहोण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे ४० ते ५० मुलं पोहोत होती. परंतु दुपारी चार वाजता महिलांची बॅच सुरू होणार असल्यामुळे तेथील कर्मचारी मालजपते यांनी सर्व मुलांना बाहेर काढले व जलतरण तलाव पुन्हा एकदा चेक केला असता. त्यांना जलतरण तलावाच्या बाजूला बूट व कपडे दिसले, संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता. जलतरण तलावात तळाशी एका तरुणाचा मृतदेह असल्याचे दिसले,

हा जलतरण तलाव चार दिवसांपूर्वीच पुणे येथील तेजपूल एजन्सीला भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला होता. परंतु आजच्या या घटनेबाबत काही तरुण याठिकाणी पाण्यात मस्ती करत असल्याची माहिती समजली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या तरुणांना पोहोता येते की नाही त्याला लाईफ जॅकेट दिले का नाही यावरून आता सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे. असे असले तरी या तरुणाचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

तरुणांची पाण्यातील मस्ती जीवावर बेतली. 
दरम्यान पोलिसांकडून समजलेली माहिती व प्रत्यक्षदर्शच्या माहितीनुसार या ठिकाणी काही तरुन बुडवाबुडवीचा खेळ करून पाण्यात मस्ती करत होते. आणि तीच मस्ती या तरुणाच्या जीवावर बेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.