नगर जिल्ह्यातील गोळीबारसत्र थांबेना,मद्यधुंद शिक्षकाने केला भावावर गोळीबार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्यातील केडगाव,जामखेड येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यात मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे.


घरगुती वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे सोमवारी (दि.१४) पहाटे हा प्रकार घडला आहे.गोळीबार करणारा शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड (रा. निवडूंगे) याच्यासह त्याची पुतणी पुष्पा पानसरे यांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. 

उद्धव कोंडीराम मरकड (रा. निवडूंगे), बाळासाहेब कोंडीराम मरकड व शांता भाऊसाहेब दहातोंडे हे सख्खे बहिण-भाऊ आहेत. शांता ही नगर येथे राहते तर उद्धव व बाळासाहेब हे निवडूंगे येथे शेजारी राहतात. उद्धव हा पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथे शिक्षक आहे. 

एक महिन्यापूर्वी उद्धव याने नगर येथील बहिण शांता हिच्या घरी जावून वाद घातला होता. ९ मे रोजी तिसगाव येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी शांता आली होती. त्यावेळी ती निवडंगे येथे भाऊ बाळासाहेब यांच्याकडे मुक्कामी थांबली होती. याचा राग धरून सोमवारी (दि.१४) पहाटे दीड वाजता उद्धव कोंडीराम मरकड याने दारुच्या नशेत बाळासाहेब मरकड यांच्या घरात घुसून पिस्तूलने बाळासाहेब मरकड यांच्यावर गोळी झाडली. पण त्यात ते बचावले. 

पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली व उद्धव यास पोलिसांच्या ताब्यात दिले. पुतणीच्या पिस्तूलमधून गोळीबार गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल बाळासाहेब यांची पुतणी पुष्पा नीलेश पानसरे व नीलेश अशोक पानसरे (रा. भगवती कोल्हार) यांच्या नावावर असून त्यांनी हे पिस्तूल उद्धव यास वापरायला दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.