नगरसेवक योगिराज गाडे यांच्याकडून माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची फिर्याद माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. 

सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तारकपूर बसस्टँण्डजवळ अजिंक्य बोरकर हे उभे असताना एका इनोव्हा गाडीमधून येऊन नगरसेवक गाडे यांनी तुझ्या आमदाराला 302 च्या गुन्ह्यात अडकविले आहे, तु जास्त बडबड करु नको नाहीतर तुझे देखील हातपाय तोडू अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बोरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी योगिराज गाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.