शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2018 पुढे ढकलण्यात आली


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2018 पुढे ढकलण्यात आली असून सुधारीत कार्यक्रम नंतर जाहिर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिली. सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने सदर निवडणूक पुढील कालावधीत घेण्याची विनंती राज्याचे मुख्य निवडणूक आधिकारी यांचेमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयेागाने सदर निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून सुधारीत कार्यक्रम नंतर जाहिर करण्यात येईल, असे आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.