महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे गंठन लांबवले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर बसस्थानकातील एस.टी.बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील साडे चार तोळे सोन्याचे गंठनासह सोन्याचे कानातील रिंगा व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केल्याची घटना रविवार दि. १३ मे रोजी भर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. एकूण ९१ हजार ८०० रुपये किंमतीचा हा सर्व मुद्देमाल आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शैलेजा रविंद्र क्षिरसागर (रा.लोणी धामणी,ता.आंबेगाव, जि.पुणे) ही महिला संगमनेर याठिकाणी काही कामानिमित्त आली होती. काम आटोपल्यानंतर पुन्हा त्या लोणी धामणीला जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकामध्ये रविवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास आल्या आणि एस.टी.बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे साडे चार तोळे सोन्याचे गंठन, १ हजार रुपये किंमतीचे कानातील अर्धा ग्रॅम सोन्याच्या रिंगा व ८०० रुपये रोख असा एकूण ९१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.