मातृदिनीच हिरावले दोन चिमुकल्यांचे मातृछत्र,सर्वत्र हळहळ व्यक्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : जन्म देणाऱ्या आईिवषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी मातृदिनाच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव सुरु होता. यावेळी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील मनिषा शिंदे यांच्या निधनामुळे मातृदिनीच दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हिरावल्याची वार्ता सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी दीपक नामदेव शिंदे यांची पत्नी मनिषा शिंदे या शनिवारी सकाळी आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात जात असताना रस्त्यावर चक्कर येऊन पडल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पती दीपक, दोन मुले सार्थक (वय ११) व स्वरुप (वय ४), सासु-सासरे, आई व वडील असे मोठे कुटुंब आहे.

मातृदिनी मनिषा शिंदे यांची निधनवार्ता सोशल मिडीयात पसल्याने आश्वी पंचक्रोशीतील लहान-थोरांसह प्रत्येकाला गहिवरुन आले होते. त्यामुळे शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्यांना श्रध्दांजली वाहण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. तर दुपारी आश्वी खुर्द येथील प्रवरातिरावर त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी शोकाकूल वातावरणात मनिषा शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.