माजी आमदार शंकरराव गडाखांना अटक व सुटका.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला,नेवासा येथील सर्वपक्षीय जेलभरो आंदोलनात सर्वपक्षीयांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला असून आज दुपारी प्रशासनाने माजी आ.शंकरराव गडाख यांच्यासह आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना नंतर सोडून देण्यात आले.


शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी,वीजबिल माफ व्हावे , दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव, शेतमालाला हमीभाव ,स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमल बजावणी ,आदी प्रमुख मागण्यासाठी शेतकरी क्रांतीकरी पक्ष व शेतकरी सुकाणू समिती,व इतर पक्षीयांच्या सहभागात हे आंदोलन संपन्न झाले. 

जेलभरो आंदोलनप्रसंगी नेवासे तालुक्याचे माजी आ. शंकररा गडाख ,कॉ बाबा आरगडे, कॉ बन्सी सातपुते ,अशोकराव गायकवाड आरपीआय नेते, सुनीलभाऊ गडाख जि.प सदस्य ,नानासाहेब तुवर ,बाळासाहेब पा नवले ,जबाजी फाटाके,अशोकराव करडक, दिगंबर रिंधे, ईश्वर उगले,बाळासाहेब लिंगायत, पांडुरंग होंडे, वामनराव तुवर, दादासाहेब दरंदले, रामदास कोरडे, कल्याण कांगुणे, रावसाहेब कांगुणे, कडूबाळ कर्डीले ,तुकाराम शेंडे, बाबसाहेब फोफसे, राजेंद्र उंदरे, देविदास जगताप, अशोकराव मंडलीक, राजेंद्र गुगळे, कारभारी जावळे, त्रिबंक भदगले, रामभाऊ केंदळे, कारभारी वाखुरे ,रवींद्र साठे, आर केशेटे ,बाबासाहेब खराडे, नागेश आघाव आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्येने या आंदोलनात उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.