श्रीगोंदा - दौंड एसटीचे चाक निखळून पडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धावत्या एसटीचं चाक निखळून मोठी दुर्घटना होता होता टळली. आज सकाळी सहा वाजता श्रीगोंद्यावरुन दौंडला जाताना सांगवी गावाजवळ एसटीचं चाक निखळलं. वाहकाच्या बाजूचं चाक गळून पडलं. तर दुसरं चाक अडकलेलं होतं.

श्रीगोंदा आगाराच्या या बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते. जुनाट नट निखळल्याने चाक गळून पडलं. काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या टँकर चालकाने चाक गळून पडल्याची माहिती दिली. मागच्या एकाच चाकावर एसटी जवळपास दोन ते तीन किमी धावल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

                                              

यानंतर काही नागरिकांनी हे चाक बारामती एसटीत पाठवून दिलं. त्यानंतर एसटीला चाक बसवण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र नट नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. जीव वाचल्याचा प्रवाशांना आनंद झाला, मात्र भररस्त्यात थांबून मनस्ताप सहन करावा लागला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.