सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावकारकडून वारंवार होणाऱ्या व्याजाच्या पैशाच्या मागणीसाठी होणाऱ्या तगाद्याला कंटाळून वाळकीच्या ४० वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याबाबत सविस्तर असे की, उमेश विष्णू कासार (रा.वाळकी,वडगाव तांदळी) यांचे वडील विष्णू कासार हे अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांनी वडीलांच्या औषधोपचारासाठी संकेत कुलट (रा.बुरूडगाव रोड) याच्याकडून पैसे घेतले होते. 



परंतु कासार यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावल्याने कुलट याच्याकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम परत करण्यास वेळ लागत होता. मात्र कुलट याने कासार यांच्यापाठीमागे पैशांचा तगादा लावत, सातत्याने पैशाची मागणी केल्यामुळे कासार वारंवार होणाऱ्या मानसीक त्रासाला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी राहत्या घरात गोचिड मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी उमेश कासार यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली असून, याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक क्षीरसागर हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.