केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी भानुदास कोतकरला पुण्यातून अटक.

फाईल फोटो. 

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडात फरार असलेल्या भानुदास कोतकरला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. स्टॅडिंग वॉरंट बजावलेला भानुदास कोतकर याला पोलिसांनी पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीसाठी आलेले असताना पोलिसांनी त्याला पकडले. \

हत्याकांड झाल्यापासून कोतकर हा फरार होता. काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकर यांचा हा चुलता आहे. महत्वाची बाब म्हणजे लॉटरी विक्रेता अशोक लांडे हत्या प्रकरणी तो जन्मठेपेच्या शिक्षा भोगत असून वैद्यकीय जामीनावर सुटला होता.

या हत्याकांड प्रकरणी विशालनं भानुदास कोतकरची सून सुवर्णा कोतकरला निवडणुकीनंतर झालेल्या वादाची माहिती दिली होती. यानंतर सुवर्णानं सासरा भानुदासशी फोन वरून या संदर्भात फोनवरुन संपर्क साधला होता. त्यामुळे या दोघांत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपास पोलिसांना करायचा आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारपासून उपोषणाला बसले आहेत. पोलिसांचा तपास योग्य पध्दतीने होत नसल्याचा आरोप दोन्ही कुटुंबांनी केला होता. फरार आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते.
---------------------------
                             नगर शहरातील ताज्या बातम्या मिळवा आमच्या Whatsapp ग्रुपवर 
                                      पुढील लिंकवर क्लिक करा आणि आजच Join व्हा !  
  
-----------------------
Powered by Blogger.