श्रीगोंद्यात युवकाची बहिणीच्या घरी साडीने गळफास घेत आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीगोंदा तालुक्‍यातील चांडगाव येथील संजय ग्यानबा घोडके (वय 35) यांनी रविवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्‍यातील सांगवी दुमाला या ठिकाणी त्यांच्या बहिणीच्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 


याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत घोडके हे मूळचे चांडगाव येथील असून ते मागील पाच सहा महिन्यांपासून श्रीगोंदा तालुक्‍यातील सांगवी दुमाला येथील त्यांच्या बहिणीकडे राहात होते. घोडके हे सतत मानसिक तणावात राहत असल्यामुळे त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू होते.

दुपारी घोडके यांची बहीण व मेव्हुणे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते तेथून परत घरी आले तेव्हा त्यांना संजय घोडके यांनी घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत श्रीगोंदा पोली ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---------------------------
                                       
-----------------------
Powered by Blogger.